३२०० एकरचा उत्तर मुंबईतला आरेचा पट्टा म्हणजे कधी काळी २७ आदिवासी पाड्यांचं घर होतं. मात्र कालांतरात अनेक प्रकल्पांनी मोठ्या प्रमाणावर इथल्या जमिनी घेतल्या आहेत, ज्यात दूध प्रक्रिया केंद्र आणि ‘फिल्म सिटी’चा समावेश आहे. नजीकच्या काळात जमीन ताब्यात घेणारा प्रकल्प म्हणजे मुंबई मेट्रोची कार शेड – ज्यासाठी नुकतीच २६०० हून अधिक झाडं तोडण्यात आली आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या सगळ्यामध्ये आदिवासींची घरंही पाडून टाकण्यात आली आहेत. अनेकांनी आंदोलनं केली, मोर्चे काढले आणि याचिका दाखल केल्या. पॉडकास्टमध्ये एक जण म्हणतो तसं – ‘मेट्रो व्हावी म्हणून एकही मोर्चा निघालेला नाही’
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.