आज १०१-१०४ वर्षं पूर्ण केलेल्या भबानी महातो स्वातंत्र्य संग्रामात आपण काहीही केलं नसल्याचं स्पष्टपणे सांगतात. पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यात, त्यांच्या घरी आम्ही त्यांची सगळी गोष्ट ऐकत जातो आणि मग मात्र त्यांचा अविरत त्याग पाहून अगदी उलट्या निष्कर्षाप्रत येतो
पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.