हिमाचल प्रदेशातलं लाहौल स्पिती खोरं. इथल्या लिंडूर गावातली जमीन गेल्या काही वर्षांत अक्षरश: धसत चाललीय. इथल्या फळबागाच नाही; तर इथल्या माणसांचे पिढ्यानुपिढ्यांचे कष्टही त्यात मातीमोल होतायत. हे गाव गायब होतंय; अगदी डोळ्यांदेखत!
वसीम कुरेशीचं स्वातंत्र्य पोलिओनं हिरावलं. विद्यार्थी दशेत शाळेत सुयोग्य जिन्यांसाठी तरसलेला वसिम, आता स्वयंरोजगारासाठी शासकीय योजनांची पायरी शोधतोय. विकलांगांच्या पायाखालचा रस्ता किती ठिसूळ कितपत पक्का याचा वेध घेणारी ग्रामीण हरियाणामधील हकीगत. आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त...
नुकत्याच झालेल्या निवडणुकीपूर्वी मतदारयाद्यांची विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) करण्यात आली. त्यात अनेक आदिवासींची नावं वगळल्याचं समोर आल्यावर काळजी नि निराशेचं सावट पसरलं. नंतर काही नावं मतदारयादीत पुन्हा घातली गेली खरी; पण मुळात ती काढलीच कशासाठी?